Covid 19 A Love Story
सकाळचे आठ वाजलेले होते. सुर्य नारायण डोळ्यांच्या दरवाज्यात कानोसा देऊन ही सुभाष रावांचे धाकटे चिरंजीव विजय निवांत बैला सारखे पडून होते.तोंडातून लाळ बाहेर येऊन ओठ पांढरे पडले होते.
छोटी मुलगी मंजुषा चहा करत होती.सर्वत्र कशी नीरव शांतता होती.जणू रामराज्यच!!!
सुभाषराव झोपेतून उठून बसले होते.
टपोरी चष्मा घालून सोफ्या मागे काही तरी शोधत होते. शेवटी न राहवून त्यांच्या पत्नी शांता ला त्यांनी आवाज दिला " तंबाखूची पिशवी पाहिलीस का ग"...
तितकाच उत्स्फूर्त प्रतिसादाने आतून आवाज आला..."फ्रीज मध्ये असेल बघा"
रागाने सुभाषराव लालबुंद झाले "फ्रीज मध्ये तंबाखू तुझ्या बापाने ठेवली होती का "
सकाळ सकाळ माझ्या बापावर जाऊ नका...शांता गर्जल्या!!
"मग रात्री जाऊ" सुभाषराव डोळे बारीक करीत म्हणाले.
मंजुषा हलकेच हसत होती.तिच्या साठी हे दररोज च होत.
तुमच्याशी बोलणेच वाईट, नाक मुरडून शांता किचन मधे गेल्या.
सुभाषरावना पोटातला गोळा आता अनावर झाला होता.त्यांची बेचैनी वाढत होती.त्यांचा एक हात पोटावर होता.दररोज तंबाखू घेतल्याशिवाय त्यांचे पोट साफ होत नसे.पोटातील गोळा जसा समुद्र तळाशी जाऊ लागला.तसा सुभाष रावना शेजारचा गंग्या आठवला. सुभाषराव ना माहित होत की गंगाराम लपून छपून तंबाखू खातो ते.गंगाराम कडे सुभाषनी धाड टाकली."गंग्या काही पण कर मला तंबाखू दे,जरा समज वेदना".पण गंगा काही पुडी सोडेना.त्यालाही माहित होत की लॉक डाउन आहे, सारी दुकाने बंद आहेत.त्याची पुन्हा पंचायत व्हायची.मी तुला देतो म्हणून सुभाषरावांनी तंबाखू ची पुडी घेऊन, लुंगिवर जो पळ काढला तो बाथरूम मधेच थांबला.
कोरोना मुळ सर्वांची त्रेधतिरपीट उडाली होती.
बाथरूम मधून फटाक्यांच्या लडी बरसत होत्या आणि धूर निघत होता.बाहेरून शांता ओरडल्या "पानी तर टाका थोड, चौका पर्यंत आवाज जातोय,फुटाणे कमी खायचे रात्री जरा"
सुभाष राव सरकारी यंत्रणेत लिपिक होते.त्यांच्या पत्नीशी जास्त कधी सख्य नव्हत. छत्तीस चा आकडा.शांता पण त्यांच्या नावाच्या उल्ट्याच !!
सुपुत्र विजय चतुर्थ वर्षाला अभियांत्रिकी चे शिक्षण घेतात. कोरोनामुळे तेही गेली १० दिवस झाल स्वर्ग सुख अनुभवत होते.आयुष्यात प्रथमच "assignments,exams , viva ". च्या मरणातून निसटून सुखाने झोप घेत होते. झोपेत विजय "बेधुंद होऊन स्वप्न सुंदरीच्या स्वप्नात होते.जणू त्याच्या मनातील आवडत्या प्रियेच्या बाहू पाशात तो विरघळत आहे.झोप कसली ही इंद्र्शय्या च होती!!झोपेत विजय "पूजा पूजा...लपून बसतेस व्हय ग" अस काहीतरी बडबडत होता.
शांता ने आपल्या पोटच्या रत्नाकडे पाहिले,बोट मोडली आणि कर्णकर्कश स्वरात म्हंट्ल..."उठ रे गिधाडा" आणि कोण ही पूजा ,देवी तर नाही आली स्वप्नात!!
अग कानठाळ्या बसल्या ना जरा हळू बोलत जा, किती मस्त स्वप्न होत.स्वप्नात देवी आली होती.मी तिच्या चरणावर नतमस्तक झालो होतो.. विजय म्हंटला.
बर बर कोणती देवी आलती काय माहित चहा पी आणि किराणा आण बाहेरून!! ही धर सामानाची लिस्ट.
चौकात पोलिस असतील,गेलो की काठ्या आणि उठबश्या !! मी नाही जाणार बाबांना पाठव विजय उद्गारला!!
जारे वागा भाजीला काहीच नाही..
१०० रुपये आगावं दिलेस तर जातो बघ...
"बर बर आई कुन लाच घेतो का चहा पी आणि निघ" शांता खेकसली.
चहा पीत पीत मंजुषा म्हंटली दादा तुझा मोबाईल चा पासवर्ड सांग ना.
डोळे वटारून विजय बाहेर निघून गेला....
(२)
रात्रीचे ०८:३० वाजली असावीत. सर्वाची जेवणे झाली होती.बाहेर सुभाषराव, कदम काका,काकडे म्हतार,पवार काका आणि जोशी अण्णा गप्पा मधे रंगले होते. जणू साऱ्या जगाचा शेअर बाजार इथूनच चालतो असे यांचे विचार उधळत होते.
कोरोनाची लस जणू हेच शोधून काढणार तस काकडे म्हतार खाकरत म्हणाल "अजून २ ते ३ महिने लागतील करिनाची लस बनायला.
"बाबांनाही नाद दिसतो म्हणायचा सिनेमा चा, करीना माहितेय!" पान थुंकत जोशी अण्णा हसले.
मधेच कदम काका बोलले..."इटलीत १००० लोक मेलेहो आज"
मधेच नाकातून शेंबूड काढून परत काकडे म्हतारं पीचकल "तुमचं होत का कोणी त्या मृतामधे"
सर्व जण हसत असता....मधेच पवार भाऊ आपल्याच तंद्रीत "अहो गल्लीतील लेकरे लई हुशार झालीत मोदींनी काल ताट वाजवायला सांगितले तर तुमच्या महेश ने गणपतीचा बॅंड च वाजवला,वरून मिरवणूक पण काढली गल्लीतून !!अभ्यासात नाही पण अशा कामात खूप पुढं आहे तुमचा महेश बरोबर ना कदम काका !!
"अहो अशाने कोरोना कसा जाईल" जोशी काका ज्ञान पाजत म्हणाले!!
मधेच पवार चमकले " संध्याकाळी दारू साठी ५ मिनिट तरी दुकाने मोकळी करायला पाहिजेत,म्हणजे लोकही घरी बसतील"
विषय तोडत सुभाषराव बारगळले
"अहो मी तर म्हणतो दारूच नाही तर तंबाखू चे घरोघरी वाटप व्हायला पाहीजे, अहो सकाळी होत नाही ना!!"
मधेच चावट चोपडे काका म्हणाले "दोन लेकर बरी झाली तंबाखू शिवाय,काय सुभाषराव"
सर्वजण हसले....
या गप्पा विजय खिडकीतून मन लावून ऐकत होता.तितक्यात मंजुषा त्याच्या जवळ गेली.दादा मला मोबाईल देना. हॉटस्पॉट पाहिजे. आईला रामायण पाहायचे होते.
मी नाही बघत तुझे मुलींसोबत चे फोटो,भैया देना रे मोबाईल" मंजुषा लाडात म्हणाली
"चल आपण रामायण बघू "विजय म्हंटला.
मंजुषा ला विश्वास होत नव्हता की तिचा भाऊ रामायण पाहतोय.कारण आता पर्यंत विजय ने देवाचे नावही कधी मुखातून काढले नव्हते.
रामायण लागले "राम आणि लक्ष्मण विश्वामित्र ऋषींचे पाय चेपत सेवा करत होते"
ते पाहून शांता ने डोळे मोठे केले व उपहासाने म्हंटली " जरा खा शेण थोड तरी, आमची पण अशी सेवा करा कधी , सुखान मरू आम्ही"
तितक्यात मोबाईल वर गाणे वाजले "ले जाये तुझे कहा हवायेन" .विजय ला कॉल आला होता.वर नाव होत "पूजा"!
आवाज दाबत मंजु म्हंटली दादा पवन चा कॉल !!
आणि मोबाईल घेऊन विजय खुशी खुशीने गच्चीवर गेला!!
त्याची प्रेयसी पूजा चा कॉल होता तो .तब्बल महिना झाल होत त्यांना भेटून ,बोलून !!
नक्षत्रांचे चांदणे फुलावे तसे त्यांचे बोलणे फुलत जात होते.जणू काही उद्या साठी काही ठेवायचे च नाही असे ते बोलत होते.खूप दिवसांनी एकमेकांचा आवाज ऐकुन दोघांना स्वर्गानंद प्राप्त झाला होता.अनेक महिन्याच्या तपश्चर्या तून समुद्रातून मोती सापडावा इतक्या खुशीत प्रेमाचे स्वर निघत होते.प्रश्नांची सरबत्ती होत होती,बोलण्यात रुसवे फुगवे उमलत होते तितक्याच निनादतेने ते फुग्या सारखी फुटत होते.प्रचंड विरहातून पावसाने धरणीला करकटून भेटावे त्या आवेगाने दोघे बोलत होते.जणू प्रेमाच्या वाफा निघतायत!!
पूजा चार दिवसापूर्वी पुण्याहून तिच्या घरी नगरला आली होती.
शेवटी पूजा म्हणाली "घरी आहे मी,वेळ कमी आहे माझ्याकडे.घराबाहेर निघू नको.काळजी घे विजु" !!
(३)
आसमंतात चंद्र फुललेला होता.दाटून आलेलं आभाळ ही नीचरत होत.चांदण्या एक एक करून डोळे मिचकावित होत्या.टिमटिमत काजवा वर उडान घेत होता.जणू सांगत होता मी सुद्धा चांदण्या पेक्षा कमी सुंदर नाही.प्रेमात माणूस कवी होतो तस विजय सारे आसमंत निरखित होता. त्याच्या मागे येऊन मंजुषा थांबली होती.
"झाल का बोलणं आमच्या वहिनी सीतेला,काय प्रभू श्रीराम तुम्ही तर कृष्ण निघालात" भुवया उंच करून मंजु म्हणाली.
"कोण सीता ,कसली सीता,कोणता कृष्ण " ती मैत्रीण होती फक्त
जास्त बनू नको वाघा...बहीण आहे तुझी मी , लहानपणापासून ओळखते तुला आणि एवढा वेळ कोणती मैत्रीण बोलते,नाटक करू नकोस नाही तर आईला सांगेल सगळ,पुजू विजू सगळ निघेल मग. मंजु दटवून बोलली...
थांब सांगतो,पण तू कोणाला नाहीस न सांगणार !!
मंजु ने नकारार्थी मान हालवली.अह...शपथ नाही.
ती तुझी वहिनी होती.मेरठ ची आहे ,सध्या नगर ला असते वडीलांसोबत.वडील आर्मी मधे मेजर आहेत.
"आणि तीच पूर्ण नाव" मंजु ने विचारले
"पूजा शर्मा"!!!फोटो दाखवत विजय बोलला.
किती सुंदर आहे,वाह भैया तू तर छुपा उंदीर निघालास!!माझी भेट कधी घालून देशील मग.मंजु खुशीने डोलली.
"कोरोना च भूत जाऊदे आपण तिघे फिरायला जाऊ बाहेर" विजय मंजु कडे गाल मोठे करत बोलला.
"परेड करायला लावेल तुला ती !! 😅
"लंगुर के हात अंगुर!! ए..कस काय पटली तुला...मंजूने फिरकी घेत विचारले.
तुझ्या भावाने २५ दिवसांचा कोर्स केला होता.२५ दिन मे लडकी पटावो सुशील और संस्कारी!!❤️😀
मंजु खुदू खुदू गालात हसू लागली.
अचानक मंजु च लक्ष विजय च्या हाताकडे गेलं.
"दादा हे देवाचं धागा तू कधी पासून घालायला,तू तर देवाला मानत नाहीस." मंजु ने भुवया उंच करत विचारल.
पूजा ने दिलाय तो धागा आणि हा रुमाल पण!!
ओह..आता पासून आमच्या भावाला मुठीत घेतलं वहिनी साहेबांनी.
मी मुठीत बसतो का झिप्रे...कान पिंगाळत विजय बोलला.
दादा खूप दिवसांनी बोललो ना आपण .हे सर्व कोरोना मुळ झालं...नाही तर आपण बोललो च नसतो इतकं हो ना!
हलकीशी मान हलवत विजय म्हंटला ,"हो...मला अस वाटतय की माझं बालपण परत आलंय.रामायण पहायची मजा!! लहानपणी शक्तिमान पाहताना अख्खी गल्ली गोळा व्हयची घरी.आज तो शक्तिमान परत आला.जो घरातला,आजुबाजुचा संवाद हरवला होता तो परत आलाय,हरवलेली माणसे परत एकदा गावाकडे आली.अग या तान तनावाची आणि स्पर्धे ची काही काळा पूर्ती तरी थांबली, भविष्या विषयी काळजी निघून गेली.
या धरणी माई ने काही काळा पुरता तरी मोकळा श्वास घेतला.माणसे जनावराहून वाईट वागली म्हणून तर ही नियती पालटली.खर तर माणसांना इथ राहायची सुद्धा लायकी नाही.कोरोनाने खूप साऱ्या गोष्टी शिकवल्या बघ मंजु.
बहीण भावाचे बोलणे सुरू असताना
खालून अचानक शांता ओरडत होत्या,गप्पा झाल्या का नाही म्हणून!
विजय बोलता बोलता अचानक थांबला,
चल रात्रीचे ११ झालेत.आई ओरडतेय.तू जा खाली मी आलोच.
मंजु खाली गेली....
विजय मात्र त्याच्या हरवलेल्या विश्वात डुंबत च चालला होता.
विजय स्वत: ला प्रश्न विचारत होता,
किती बदललास तू. प्रेम सगळ बदलाय मजबूर करते. तिन जादू केली माझ्यावर, निवडुंग सारख्या शुष्क जीवनावर स्नेहाची,प्रेमाची,कोमल शब्दांची मुसळधार वर्षा केली तिने.
अबोल मनाला गोंजारून हृदयाला पाझर फोडला तिने.मी देव मानत नव्हतो पण आता सर्व मानतोय.जग सुंदर वाटतेय,भरभरून जगावस वाटतंय....या विचारात विजय त्याच्या खोलीत गेला.
उद्या मोदींनी दिवे लावायला सांगितलेत हे त्याच्या ध्यानी आल्..!!आणि तसाच विचारात पहुडला...
(4)
रात्रीचे २:०० वाजली असावीत.मध्य रात्र.बाहेर किर्र अंधार. चीचुंद्रू आवाज काढत होती. दोन चार कुत्री बाहेर भुंकत होती.वाऱ्याची गती खिडकीवर आदळत होती. घड्याळीचा काटा टक टक आवाज करत पुढे सरकत होता.
म्हतारा पंखा आवाज काढत कासवा सारखा पळत होता.
विजय च्या बाजूला ढोली नावाचं मांजर घुरत होते.
विजयने झोप येत नाही म्हणून नेपोलियन हिल च कोणत तरी पुस्तक काढून बसला.अचानक किचन मधे ग्लास पडल्या चा आवाज झाला.शांता जागी झाली.किचन मधे जाऊन पाहते तर काय दोन चोर फ्रीज उघडून द्राक्ष खातायत.
शांता मोठ्याने चिरकली....चोररररररर!!! वाचवा.... विज्याचे पप्पा उठा....बंदूक काढा.
अग का ओरडतेयस बंदूक नाही आपल्याकड तुला माहितेय ना. सुभाषराव हॉल मधून ओरडले.
अहो चोर आलेत... पळाले पळाले!!
आवाज ऐकुन सर्व जण जागे झाले.विजय धावत धावत गेला,सुभाषराव लुंगी सांभाळत पळत आले. आवाजाने गल्ली जागी झाली होती.
दोन चोर खिडकीतून उडी मारताना कंपाऊंड भिंती ला आदळले व कचाट्यात सापडले.
कदम काका,जोशी अण्णा,काकडे म्हतार लगबगीने आल.सुभाषराव नी एकाच्या गालात जोरदार ठेऊन दिली.
सुभाषरावना राग अनावर झाला
" काम करता येत नाही का भाड्या?फुकट खातो!"
काकडे म्हतार खाकरत म्हणाल "ही धरा काठी आणि बडवून काढा यांना"
कदम म्हणाले " अहो द्या पोलिसात,आधीच कोरोना चा वैताग आणि त्यात हे भुरटे वांदे"
ते दोन्ही चोर दया याचना करू लागले.
साहेब माफ करा,पण पोलिसात देऊ नका.माझी लहान लहान लेकरे बाळ आहेत.आम्हाला पण नाही हो चोरी करावं वाटतं. पण या कोरोना न आमचं काम आणि पोट दोन्ही मारल बघा."
दुसरा चोर आर्जव करू लागला
"साहेब, आम्ही दिवसाला ३०० रुपये कमवून जगणारी माणसं, उद्या चा इचार आम्ही नाहीत करत.१५ दिवस झाल काम बंद आहे,कंपनी बंद केली,दुकान बंद केले आम्ही कुठ रोजान जायचं. जमवलेला सगळा पैसा संपला.चार दिवस झाली पोर आणि आम्ही उपाशी आहोत. त्यांचं बापाकड केविलवान बघण मला नाही हो सहन झाल.रोगान जमीन जादे व नोकर वर्गाला काहीच तान नाही पण असली मरण तर आम्हा मजूर, गरिबांच आहे.
साहेब आम्ही दाग दागिने पैसे याच्या साठी नव्हतो आलो.फक्त फ्रीज मधी काय खायला आहे,कुठ दोन भाकरी मिळतील ते पाहत होतो.
दोन्ही चोर धायमोकलून रडत होते.
कोरोना मुळ त्यांची ही अवस्था पाहून सर्वाची मने भरून आली.
त्या दोघांना माणुसकी म्हणून सर्वांनी पोटभरून खाऊ घातले.सोबत गहु आणि धान्य दिले. आजुन लागलं तर इथ मागून ने पण चोरी करू नको अस बजावले ही.
आज ही आपल्या समाजात माणुसकी शिल्लक आहे हे पाहून काकडे म्हताऱ्यच्या डोळ्यात पाणी आलं.
(5)
गल्लीतील सर्व मंडळी आज जोशी अण्णा च्या घरा पुढं आली होती.कारण काही तस होत.किराणा आणायला गेलेल्या जोशी अण्णा चा पृष्ठभाग पोलिसांनी चार दांडूनी सुजवला होता.
कुणाला उनाड चर्चा करण्या शिवाय काहीच काम धंदा उरला नव्हता.
अहो काकडे बाबा परवा दिवशी आपण थाळ्या वाजवल्या
आज पोलिसांनी जोशी अण्णा चा पृष्ठभाग वाजविला, दे दना दन!! पवार बोलले."चला तुमचा महेश कोणते दिवे लावो न लावो पण घरा पुढं दिवे आज छान लावतोय" टोचून पवार बोलले.
जोशी अण्णा खाकरत आणि खूप घान थुंकत बोलले " अहो एका ४ वर्षाच्या वाघिणीला कोरोना झाला म्हने"
"मग तुमच्या ४० वर्षाच्या वाघीनीला सांभाळून ठेवा मग" कदम मधेच पचकले आणि सर्व जण हसू लागले.
बाकी कदम काकांचे जोक्स आणि आठवल्यांच्या कविता भारीच असतात सुभाषराव हसले.
सर्व गल्लीत दिवे लागले होते.जणू दिवाळी आलीय अस भासत होत.फक्त कमी लाडू चकल्यांची होती.
विजय पण ९ मिनिट लाईट बंद करून साठी दिवे लावत होता.
जणू आज आपला अख्खा हिंदुस्थान जगाला, जगातील सर्व डॉक्टर ,पेशंट ,पोलिस यांना दुवा देत होता.
२-४ दिवस गेले असतील सकाळी सर्व जन बातम्या पाहत बसले होते.
जनता सहकारी बँक प्रस्तुत "abp माझा" मधे ज्ञानदा कदम ठळक बातम्या देत होती.नगर मधे एक २२ वर्षीय मुलगी कोरोना बाधित.पेशंट गंभीर स्थिती आहे.
पुण्यात पाहुण्याच्या घरीहून नगर ला ७ दिवसापूर्वी आलेल्या त्या मुलीनं वेळीच चेक अप केलं नव्हत आणि तिला कोरोना झाला होता.
विजय च्या काळजाचा ठोका चुकला .त्या कोरोना बाधित मुलीचं नाव होत "पूजा शर्मा".
टीव्ही वर फोटो ही तिचाच.
विजय दुसऱ्या रूम मधे आला.
मनातल्या मनात कावरा बावरा झाला.मन सुन्न झाले.डोक चालन बंद झालं.आतल्या आत अश्रूंची गंगा वाहत होती.त्या पाण्याला वाट ही मिळत नव्हती.विजय ने तत्काळ पूजा ला कॉल केला. तो तिच्या आईने उचलला.कोणीच बोलण्याच्या अवस्थेत नव्हत.पण त्याला नगर च्या दवाखान्या चा पत्ता मात्र भेटला.
शोक आवरून,मन घट्ट केले.बाहेर लॉक डाउन होत.कस ही करून तिला भेटायला जायचं म्हणून ठरल.
वडिलांचं सरकारी ओळखपत्र घेतल.त्यावर स्वतः चे छायाचित्र लावले.स्वतः च्या गावा पासून नगर पाच तासा वर होत.घरात कोनालाही न सांगता तो गाडीवर निघाला.
सारे रस्ते सुन्न होते,प्रेत यात्रेत ही एवढी स्मशान शांतता नसेल !!पोलिस ठीक ठिकाणी होते.पण ओळख पत्र दाखवून विजय आलाच.
भर धाव वेगाने नगर गाठून दुपारी तो दवाखान्यात पोहचला.सारे रुग्णालय रिक्त असल्या सारखेच होते. आर्मी चा दवाखाना होता तो स्वच्छ.
ज्याने त्याने मेडिकल मास्क, गाऊन,ग्लोव्हज, आईज प्रोटेक्शन घातलेले.सर्व जण एक मीटर च्या अंतरावर थांबलेले.सफाई कामगार भिंत न भिंत,प्रत्येक खाट स्वच्छ करत होते.त्यांच्या हिंमतीची दाद द्यावी लागेल.जीवावर उदार होऊन ते काम करत होते.
विजय ला पुजाचे आई वडील भेटले. विजय ने तो पूजाचा मित्र असल्याचे सांगितले. तिच्या आईला तो आधीपासून परिचित होता.बहुदा पूजाच्या मोबाईल मधे विजयचा फोटो पाहिला असावा.
कस काय दुर्लक्ष झालं अस विचारल असता पूजा ची आई काहीच नाहीत बोलल्या.त्या निशब्द होत्या.डोळे लालेलाल झाले होते.
डोळ्या खाली रडून, जागून काळया सुरकुत्या पडल्या होत्या.काहीही केलं तरी ती आई होती शेवटी!
विजय ला पूजा दिसली. नेहमी सारखी नाही.बंद काचे च्या रूम मधे होती. ICU मध्य . शेवटचे श्वास मोजत होती.पूजा च्या नाका तोंडात नळी होती,अंग झाकून होते.आतल्या आत ती आक्रंदत होती.तिच्या वेदना कोणी समजू शकत नव्हते.त्रास प्रचंड होता.सर्व डॉक्टर पेशंट जवळ जायला पण घाबरत होते.आतून एकदा पाहुद्या अशी विनवणी विजय ने केली पण डॉक्टरांनी त्याला बाहेर काढले.
विजय च्या डोळ्यातून अश्रूंचा पाट वाहत होता.काचेतून तिला पाहतना तो धायमोकळून रडत होता.काय ही महामारी.जन्म मृत्युचा खेळ चालू होता.
एखाद्या व्यक्तीच्या छायेत माणूस घडलेले चांगले क्षण परत एकदा जगत असतो.दवाखान्याच्या बाहेर नीरव शांतता होती,हवा विरान होती,आभाळ आले होते, हलक्याश्या सरी बरसत होत्या.त्या सरिंमधे त्याला पूजा दिसत होती.आकाशात सूर्य ढगाआड लपत होता.जणू पुजाच लपाछपी चा खेळ खेळतेय.पण शोधण्याचे राज्य मात्र विजय वर!ती आता सापडू शकणार नव्हती.
निसर्गाला धक्का लावण्याचं एवढं मोठं प्रायश्चित पूजाच्या च वाट्याला का?ते अभागी कृत्य प्रत्येक मानवाने केलेय,या प्रश्नांच्या उत्तरात तो धुमसत होता.त्याच शंका समाधान होत नव्हत.
अखेर आभाळ गर्जण्याचा आवाज आला.पण तो आवाज आत मधून येत होता.पूजाची आई जीव पडू पडू रडत होती.अंगाला कापरे सुटत होते. डॉक्टर नी पूजाला मृत घोषित केले. कोरोना ची लढाई ती हरली होती. एक निरागस चेहरा ICU मध्ये निपचित पडला होता. कायमचा मुक झाला होता.एकुलती एक कन्या!
नियती एवढी निष्टुर कशी होऊ शकते. पूजाचे वडील तिच्या आईला सांभाळत होते.पूजा अखेर बरसलेल्या सरी प्रमाणे जमिनी मधे विलीन झाली होती. तिचं शरीर कापडी सूट मधे बांधलेलं.आई पूजा ला पाहण्यासाठी वारंवार पळत होत्या...एकच स्वर ऐकू येत होता...."मेरी बच्ची"!!! डॉक्टरांनी प्रेताला हात लावू दिला नाही.कोण म्हणतंय प्रेत!! नाही....प्रेत नव्हत ते विजय साठी आयुष्य होत.तिच्या आई साठी अजून लेकरूच होत ते.
हे पाहून वाऱ्यालाही कंप फुटावा तसा तोही चवतळा. आकशालाही शहारे यावे तसा पाऊस कोसळू लागला. पुजाची बॉडी अंबुलान्स मध्ये भरण्यात आली.विजय ते सगळ पाहत होता.फक्त आसवे ढाळत होता.एका आई चे चित्कार स्वर पाहून पृथ्वी फाटावी, तस आईच काळजी फाटल होत. त्या हांबरड्यान झाडांची पाने ही स्तब्ध झाली होती.
पूजाचे आत्पिष्ट सर्वजण निघून गेले होते. दवाखान्या बाहेर फक्त विजय थांबला होता.भिजत!!आठवणी च्या महापुरात डुंबत!! Titanic च्या दृष्यालाही परत भावूक करेल असे ते दृष्य होते.
पूजा ने दिलेल्या रुमालानेच अश्रू पुसत होता.पावसा मधे भिजणारा एक कुत्रा त्याच्या जवळ आला होता.त्या कुत्र्या कड बघून विजय मोठ्यानं आर्जवी गर्जत होता...."तुला मारणारे ते चिनी,ते व्हायरस आणणारे ते चिनी मग त्याची शिक्षा एका निष्पापा ला का??"कोणता गुन्हा केला तिने.
ते शेवटी कुत्रच होत, त्याला सर्व माणसे सारखीच!!!
डॉक्टर ही निसर्गापुढं हतबल झाली होती.
मंजु ला त्याच्या वहिनी शी भेट घालून द्यायची राहिली होती.भविष्यातील अनेक स्वप्नांची माती झाली होती.हातावरील धाग्याकडे पाहून तो दिवस आठवत होता.तो स्पर्श आठवत होता जेव्हा हा धागा पुजाने विजय ला बांधला.
माणसाचा देह किती नश्वर,क्षुल्लक आहे हे निसर्ग सांगत होता.आपल्यातील कोण उद्या जाणार आहे याचा मागोसा कोणालाच नाही.तरी पण माणूस एवढा घमंडी का?नात्यांची किंमत आणि कदर नक्कीच कोरोनाने शिकवली होती. तुमचा अपार धन ,पैसा, साैंदर्य तुम्हाला बरोबर घेऊन जाता येत नाही शिवाय आठवणीच्या!!
अचानक मोबाईल वाजला "ले जाये तुझे हवाएं" !! ती ट्यून ही पुजानेच ठेवली होती. पण दुर्दैवाने तो तिचा कॉल नव्हता.तो विजय च्या आईचा कॉल होता,तो कॉल न उचलताच विजय परत कुत्र्या ला गोंजारू लागला.....❤️😓
Be kind with free of cost.nothing is permanent. 🌹
Harish Vrindavan❤️
Comments