Covid 19 A Love Story
(1) सकाळचे आठ वाजलेले होते . सुर्य नारायण डोळ्यांच्या दरवाज्यात कानोसा देऊन ही सुभाष रावांचे धाकटे चिरंजीव विजय निवांत बैला सारखे पडून होते.तोंडातून लाळ बाहेर येऊन ओठ पांढरे पडले होते. छोटी मुलगी मंजुषा चहा करत होती.सर्वत्र कशी नीरव शांतता होती.जणू रामराज्यच!!! सुभाषराव झोपेतून उठून बसले होते. टपोरी चष्मा घालून सोफ्या मागे काही तरी शोधत होते. शेवटी न राहवून त्यांच्या पत्नी शांता ला त्यांनी आवाज दिला " तंबाखूची पिशवी पाहिलीस का ग"... तितकाच उत्स्फूर्त प्रतिसादाने आतून आवाज आला..."फ्रीज मध्ये असेल बघा" रागाने सुभाषराव लालबुंद झाले "फ्रीज मध्ये तंबाखू तुझ्या बापाने ठेवली होती का " सकाळ सकाळ माझ्या बापावर जाऊ नका...शांता गर्जल्या!! "मग रात्री जाऊ" सुभाषराव डोळे बारीक करीत म्हणाले. मंजुषा हलकेच हसत होती.तिच्या साठी हे दररोज च होत. तुमच्याशी बोलणेच वाईट, नाक मुरडून शांता किचन मधे गेल्या. स...