६ जून इतिहासाला कलाटणी देणारा दिवस
६ जून इतिहासाला कलाटणी देणारा दिवस
काही माणसांच्या व्यक्तिमत्त्वात कमालीचं चैतन्य असत.त्यांच्या ध्येय शक्तीने निवडुंगा लाही पालवी आणणारे,वाळवंटात पाण्याचे फवारे सोडणारे विलक्षण मोतीं या धरणीत निपजले. भगत सिंग, सुभाषचंद्र बोस,भगवान श्री कृष्ण यांची साधी नावे जरी ओठावर घेतली तरी माझ्या हातांना विद्युत तार झोंबल्यासारखी होते. काय माणसे होते ही!! बेधडक,बेभान,प्रचंड ध्येयवाद,त्यागी.
आणि मी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच नाव घेतो तेव्हा ही वीज नुसतीच झोंबत नाही तर ती माझ्या शरीराच्या आरपार जाऊन माझे नेत्र अभिमानाने लाल करते.सीना ताठ करते,नजर भेदक करते.आज या आपल्या लाडक्या महान प्रतापी राजाचा ३४६ वा राज्यभिषेक सोहळा !!
औरंगजेब १२ वर्षाचा असेल तेव्हा मुघलांचा विस्तार काबूल कंदहार पासून आसाम पर्यंत भिडलेला होता. संपत्ती अगणित होती.त्यांची सैन्यबळ लाखो होत.आपला धर्म बुडाला होता,मंदिरे दयनीय अवस्थेत होती.बायका लेकरे यांचं जीवन तर सोडा.साधे पशू ही सुरक्षित नव्हते.मराठी माणूस स्वाभिमान गमावून बसला होता.परकियांच्या पदरी नोकरी करत होता.कोणाच्या बाहुत इतके बळ नव्हते की हे तीमिर प्रकशात बदलेल.
कोणी या मातीतून राजा बनेल ही शून्य शक्यता होती,निव्वळ दिवास्वप्न होत!!म्हणूनच आजचा हा दिवस खूप मोठा,सुवर्ण अक्षरांनी कोरून ठेवण्या सारखा आहे. काय काय नाही दिलं आपल्या या राजानं.राज्य दिलं,स्वाभिमान दिला,जगण्याची उर्मी जागवली हीच किती मोठी गोष्ट.केवळ काही मावळ्यासोबत तुटपुंज्या साधना सहित सुरू झालेलं स्वराज्य, राज्याभिषेका प्रसंगी केवढ विशाल झाल होत. राज्याभिषेकात तब्बल
१ करोड ४२ लक्ष होण एवढा खर्च झाला होता या वरून महाराजांनी आयुष्यात कधी विश्रांती घेतली नाही हे लक्षात येतं.
हा राज्याभिषेक सोहळा कोण्या चमत्कारा पेक्षा कमी नव्हता.परंतु हा चमत्कार महाराजांनी अवघ्या ५० वर्षात रात्र न दिस धावून पूर्ण केला होता.काय कमी वादळे होती राजेंच्या आयुष्यात कित्येक प्रसंग अशी आहेत जिथं फक्त पराभवाची अपेक्षा केली जाऊ शकते,खूपदा मृत्यू शिवून गेला.
केवळ परकियांशी नव्हे तर स्वकियांशी ही लढावं लागलं. राज्याभिषेका साठी पण विरोध झाला.पण मुसद्दी पणा,पण केवळ प्राणाला प्राण देणारी माणसे निर्माण केल्या मुळे,अथक जिद्द आणि पराक्रम जोडींने सारे सुसाध्य झाले.
महाराज १८००० दिवस जगले,१२००० दिवस प्रचंड कष्टाचे होते.६००० दिवस बालपणीचे सोडून द्या.
राज्याभिषेकानंतर औरंगजेब प्रचंड दु:खी झाला होता,की एक सह्याद्री मधील साधा माणूस राजा बनतोच कसा.आपल्याला शह देतोच कसा.पण मनात आणले तर एक माणूस काय काय करू शकतो हे महाराजांनी दाखवून दिले.
महाराज प्रत्येक मृत सैनिकाच्या घराची जबाबदारी घ्यायचे.त्यांच्या घरी जायचे.विचारपूस करायचे.आजचे जनतेचे सेवक (लुटारू) अस करतात का? मराठी भाषेस चांगले दिस आणले,फारसी भाषेचा वाढता उल्लेख कमी करून राज्य कारभार मराठीत केला .
राजाचं शेतकरी धोरण आजच्या काळा ला सुद्धा पूरक आहे.प्रचंड दुष्काळात प्रत्येक व्यक्ती,पशू त्यांनी वाचवला.केवढी महान ही दूर दृष्टी आणि रयतेचा कळवळा.प्रचंड सावधता,माणसे सोबत घेऊन चालणे,त्यांना मोठं करत करत आपल राज्य मोठं करन
जगाच्या इतिहासात कोणत्याही राजानं अस मूल्य दिलं नाही अस चारित्र्य महाराजांनी दिलं. साध्या विनय भंगाला पण हात पाय तोडायची शिक्षा असे.आज देशात बलात्कार होतात,आपण फक्त स्टोरी पोस्ट करायचे कामे करतो.रस्त्यावर भिडल्या शिवाय क्रांती होत नाही.न्याय सुद्धा हिसकावून घ्यावा लागतो.आपण महाराजांचा राजकीय तज्ञ म्हणून उदोउदो करतो, स्टेटस ठेवतो. पण हेच लोक महाराजांकडून काहीच शिकत नाही.त्यांना साधी गल्ली बदलणे ही जमत नाही.
या राष्ट्रात महाराज होऊनही आपण गुलामीच्या डोक्याने वावरतो,इतपत की आपली स्वप्ने ही कोणाच्या तरी चरणी वाहतो.अशी जगण्याची भीती या प्रतापी राजाने कधीच नाही शिकवली. आपण आपल्या इतिहासाची कदर करत नाहीत,जे सार्वभौम् राज्य निव्वळ रक्ताच्या पाटांणी बनलय त्याचा थेंब ही आपण माहित करून घेत नाहीत.
शिवरायांचा जन्म झाला तेव्हा कोणालाच खात्री नव्हती की ते वाचतील म्हणून ,या आधीचे २ बाळंतपण ही दगावले होते.पण ईश्वरी कृपेने ते वाचले आणि अखंड जगताचा उद्धार झाला.एक खरोखर राजा,महान शासक यांच्या राज्याभिषेक दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा!!
लिहताना मनात राजेंचे शेकडो विषय आहेत पण त्याची पूर्तता करवयास शेकडो पाने अपुरे पडतील.आपला इतिहास प्रचंड.त्यागाचा , वादळाचा, कर्तृत्वाचा आहे त्याचा अभिमान बाळगुया...
आणि होय कुठेतरी वाचलं होत शिवराय हे डोक्यात घालण्याचा विषय आहे !!
जय शिवराय !!
#Harish
Comments