Posts

Showing posts from October, 2023

६ जून इतिहासाला कलाटणी देणारा दिवस

Image
  ६ जून इतिहासाला कलाटणी देणारा दिवस काही माणसांच्या व्यक्तिमत्त्वात कमालीचं चैतन्य असत.त्यांच्या ध्येय शक्तीने निवडुंगा लाही  पालवी आणणारे,वाळवंटात पाण्याचे फवारे सोडणारे विलक्षण मोतीं या धरणीत निपजले. भगत सिंग, सुभाषचंद्र बोस,भगवान श्री कृष्ण यांची साधी नावे जरी ओठावर घेतली तरी माझ्या हातांना विद्युत तार झोंबल्यासारखी होते. काय माणसे होते ही!! बेधडक,बेभान,प्रचंड ध्येयवाद,त्यागी. आणि मी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच नाव घेतो तेव्हा ही वीज नुसतीच झोंबत नाही तर ती माझ्या शरीराच्या आरपार जाऊन माझे नेत्र अभिमानाने लाल करते.सीना ताठ करते,नजर भेदक करते.आज या आपल्या लाडक्या महान प्रतापी राजाचा ३४६  वा राज्यभिषेक सोहळा !! औरंगजेब १२ वर्षाचा असेल तेव्हा मुघलांचा विस्तार काबूल कंदहार पासून आसाम पर्यंत भिडलेला होता. संपत्ती अगणित होती.त्यांची सैन्यबळ लाखो होत.आपला धर्म बुडाला होता,मंदिरे दयनीय अवस्थेत होती.बायका लेकरे यांचं जीवन तर सोडा.साधे पशू ही सुरक्षित नव्हते.मराठी माणूस स्वाभिमान गमावून बसला होता.परकियांच्या पदरी नोकरी करत होता.कोणाच्या बाहुत इतके बळ नव्हते की हे तीमिर प्रक...