सॉरी आजोबा....
सॉरी आजोबा: एकदा आषाढी एकादशीच्या ठीक काही दिवस आधी पंढरपुरला गेलो होतो. रात्रीचे साडे नऊ वाजले होते. अर्ध्या एक तासात विठ्ठलाचे दर्शन द्वार बंद होऊन ते सकाळी पाच वाजता उघडणार होते. मी आणि माझा मित्र सोबत होतो. आम्हाला वाटले की आषाढी अजून थोडी दूर आहे दर्शनाला गर्दी नसेल पण काय आश्चर्य! हजारो भाविक रांगेमध्ये तब्बल बारा बारा तास थांबून होते तरी त्यांचा विठुरायाचे दर्शन अजून लाभले नव्हते. भक्तांची रांग अक्षरशः पंढरपूर ते गोपाळपूर गावापर्यंत पाच किलोमीटर पर्यंत पोचली होती. पांडुरंगाच्या दर्शनाला रांगेत घुसण्यासाठी आम्ही एक शॉर्ट कट मार्ग अवलंबिला. काही व्यक्तीसोबत ओळख करून मी पटकन रांगेत घुसलो. माझ्या मित्राला पटकन शिरता काय आले नाही त्यामुळे तो मागे पडला. त्यानंतर विठुरायाचे दर्शन मी अवघ्या अर्ध्या तासात घेतले आणि आनंदाचा मोकळा श्वास टाकला. तद्नंतर मित्राचे दर्शन झाले नव्हते म्हणून आम्ही पहाटे चार वाजता आता आणखीनच चांगल्या प्लॅनिंगने रांगेतील वारकऱ्यंसोबत मैत्री करून, त्यांना चहा पाजून ओळख केली आणि पहाटे पाच वाजता दर्शन सुरू होताच रांगेत घुसलो. यावेळी बाहेर...